*कोंकण Express*
*कणकवली विद्यामंदिरमध्ये शहरातील प्राथ.शाळांच्या विद्यार्थ्यांना विज्ञान सहलीचे मार्गदर्शन*
*कणकवली : प्रतिनिधी*
विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेत कणकवली शहरातील प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांना विज्ञान विषयाची अभिरूची वाढविण्याच्या उद्देशाने गोवा विज्ञान केंद्र व शरद सावंत फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. प्रशालेतील विद्यार्थ्या बरोबरच शहरातील मराठी प्राथमिक शाळांमधिल विद्यार्थ्यांची विज्ञान विषयांची अध्ययन क्षमता सुधारावी आणि अध्ययन स्तर उंचावावा यासाठी सर्व विद्यार्थ्यांना विद्यामंदिर प्रशालेत मुख्याध्यापक श्री पी जे कांबळे सरांनी निमंत्रण देवून प्राथमिक शाळांतील विद्यार्थी आणि शिक्षकांना विज्ञान विषयांचे मार्गदर्शन करण्यात आले.
प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अडचणी लक्षात घेऊन विद्यामंदिर प्रशालेने सुंदर असा उपक्रम राबवून विद्यार्थांची ज्ञान पातळी विकसित केली.या उपक्रमासाठी कला शिक्षक श्री प्रसाद राणे सरांनी खूप मेहनत घेऊन प्राथमिक शाळेमधिल विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले.विज्ञान शिक्षिका सौ शर्मिला केळुसकर मॅडम यांनी प्राथमिक शाळेतील विद्यार्थांना सावंत फौडेशन ‘ गोवा विज्ञान केंद्र तसेच विद्यामंदिर प्रशालेचा विज्ञान विभाग व प्रशालेची विज्ञान प्रयोगशाळा या विषयी उत्तम मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांना विज्ञानाची अभिरूची वाढविली.
जेष्ठ शिक्षक श्री अच्युतराव वणवे सरांनी प्रशालेतील विविध उपक्रमाची माहिती सांगून विज्ञान विषयाचे मार्गदर्शन केले पर्यवेक्षिका सौ वृषाली जाधव मॅडम यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या . यावेळी कणकवली शहरातील शाळा क्रमांक २ ,शाळा क्रमांक ३ आणि शाळा क्रमांक ५ या प्राथमिक शाळेतील शिक्षक ,शिक्षिका उपस्थित होते.प्रशालेतील शिक्षक श्री संदिप कदम सर श्री जनार्दन शेळकेसर उपस्थित होते.विज्ञान विभाग प्रमुख श्री पृथ्वीराज बर्डे सरांनी आभार मानले .