*कोंकण Express*
*आयशर टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी*
*सावंतवाडी : प्रतिनिधी*
आकेरी येथे आयशर टेम्पोची धडक बसून मोटारसायकलस्वार गंभीर जखमी झाला. कुडाळ तालुक्यातील माणगाव खोऱ्यातील नानेली येथील दीपक विनायक सावंत वय 19 हा युवक झाराप येथे मोटार सायकलने जात असताना कुडाळच्या दिशेने सावंतवाडी येथे येत असताना आकेरी येथे आयशर टेम्पो धडक बसून विनायक सावंत गंभीर जखमी झाला.त्याच्या डोक्याला व डोळ्याला गंभीर दुखापत झाल्याने तिथल्या ग्रामस्थांनी 108 रुग्णवाहिका कॉल करून कुडाळ येथून या युवकाला सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये प्राथमिक उपचाराकरता दाखल केले..
यावेळी डॉक्टर निखिल अवधूत अस्थिरोगतज्ञ यांनी व तेथील डॉक्टरांनी योग्य तो औषधोपचार करून सिटीस्कॅन करण्यात आले असून लगेचच सावंतवाडी पोलीस स्टेशन चे अधिकारी यांनी घटनास्थळी व सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये आले असून त्यांच्याकडून तपास चालू आहे.आयशर टेम्पोचा ट्रक ड्रायव्हर व क्लीनर यांनी हा अपघात झाल्याने भीतीमुळे पलायन केले असून पोलिसांनी शोध कार्य सुरू केलेले आहे अशी माहिती जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र मसुरकर सावंतवाडी यांनी दिली आहे
सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये नानेली या गावातील ग्रामस्थ व मित्रमंडळी नातेवाईक रात्री उशिरापर्यंत रुग्णालयामध्ये उपस्थित होते.सदरील व्यक्तीला पुढील उपचारासाठी मेंदूला दुखापत झाल्याने गोवा बांबुळी येथे पाठवण्यात आले असून सामाजिक कार्यकर्ते राजू मसुरकर यांनी सहकार्य केले आहे.