*कोंकण Express*
*वेंगुर्लेत भाजपाच्या सदस्यता अभियानास नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद*
*वेंगुर्ला : प्रतिनिधी*
भारतीय जनता पार्टीच्या सदस्यता अभियान २०२४ चा शुभारंभ २ सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाला. भारतीय जनता पार्टीची विचारसरणी सामान्य नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी हे अभियान हाती घेण्यात आलेले आहे.
काश्मीर ते कन्याकुमारी, अंदमान निकोबार ते कच्छ अशी देशभर सदस्य नोंदणी केली जाणार आहे. भारतीय जनता पार्टी हा जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष आहे. या अभियानात पक्षाची सदस्य संख्या आणखी वाढवून विविध समाज घटकांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न या अभियानाद्वारे केला जाणार आहे. या माध्यमातून पक्षाची विचारधारा, सैद्धांतिक भुमिका सर्व सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचे काम केले जाणार आहे. भाजपा कार्यकर्ता देशहिताला सर्वोच्च प्राधान्य देतो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमीच सांगत असतात. पक्षाचे कार्यकर्ते हे देशाच्या, जनतेच्या सेवेसाठी आहेत, ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भुमिका आहे. ही भुमिका सामान्य नागरिकांपर्यंत पोहचावी तसेच सामान्य नागरिकांचा विकसित भारताच्या उभारणीत सहभाग वाढावा, असा उद्देश सदस्यता अभियानामागे आहे असे प्रतिपादन जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई यांनी केले.प्रकाश रेगे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करुन भाजपा च्या प्रत्येक कार्यकर्त्याने किमान २५ सदस्य करावेत,असे आवाहन केले.
यावेळी वेंगुर्ला तालुका अध्यक्ष सुहास गवंडळकर, जिल्हा निमंत्रित साईप्रसाद नाईक, जि.का.का. सदस्य मनवेल फर्नांडिस, ता. उपाध्यक्ष लक्ष्मीकांत कर्पे, ता. सरचिटणीस बाबली वायंगणकर, आय टी सेल जिल्हा संयोजक ऋषी ( केशव) नवाथे, महीला मोर्चाच्या सुजाता पडवळ, वृंदा गवंडळकर, सारीका काळसेकर , आरवली, शिरोडा, रेडी, शक्ती केंद्र प्रमुख अनुक्रमे महादेव नाईक, मयूरेश शिरोडकर, जगन्नाथ राणे , आरवली सरपंच समीर कांबळी, रेडी उपसरपंच नमिता नागोळकर, आरवली ग्रामपंचायत सदस्य रिमा मेस्त्री, मा. सरपंच तातोबा कुडव, अणसूर सरपंच सत्यविजय गावडे, आसोली सरपंच बाळा जाधव, माजी सरपंच श्रध्दा जाधव, मोचेमाड ग्रामपंचायत सदस्य नारायण गावडे, शिरोडा बूथ अध्यक्ष अनुक्रमे संतोष अणसूरकर, सुरेश म्हाकले, स्वप्नील तोरस्कर, श्रीकृष्ण धानजी, चंद्रशेखर गोडकर, प्रसाद परब, शिरोडा भाजप पदाधिकारी अनिल गावडे, विदयाधर धानजी, बाळकृष्ण परब , शिरोडा माजी सरपंच विजय पडवळ, शिरोडा महिला पदाधिकारी समृध्दी धानजी, गंधाली करमळकर, स्नेहा गोडकर, मनीषा भोपाळकर, पुष्पलता परब, शिरोडा ग्रामपंचायत सदस्य हेतल एवडे, रेखा नाईक,भाजप महिला पदाधिकारी श्रध्दा धुरी, मोचेमाड बूथ अध्यक्ष उदय गावडे, किसान मोर्चा तालुका उपाध्यक्ष सत्यवान पालव, मोचेमाड बूथ अध्यक्ष उदय गावडे, किसान मोर्चा तालुका उपाध्यक्ष सत्यवान पालव, आरवली बूथ अध्यक्ष मिलिंद साळगांवकर, आरवली भाजप पदाधिकारी रवींद्र कुडाळकर, विश्वनाथ उर्फ भाई शेलटे, गजानन नाईक, वासुदेव आरोलकर, चंद्रकांत कांबळी, ज्ञानेश्वर केरकर, आरवली महिला पदाधिकारी नंदिनी आरोलकर, आसोली शक्तिकेंद्र प्रमुख विजय बागकर, बुथ प्रमुख बाळू वस्त , सागरतीर्थ ग्रा. सदस्य पाडुरंग फोडनाईक, उभादांडा बुथ प्रमुख दादा तांडेल, अनुसूचित जाती मोर्चाचे मधु माडकर व देवदत्त चव्हाण उपस्थित होते.
यावेळी गोवा राज्यातील म्हापसा येथील मा.नगराध्यक्षा शुभांगी वायगंणकर व मा.नगरसेवक गुरुदास वायगंणकर यांनी भेट देऊन अभियानाचे कौतुक केले.