*कोंकण Express*
*सावंतवाडी येथे ५ डिसेंबर पासून योगोपचार शिबीर*
*सावंतवाडी : प्रतिनिधी*
सिंधुदुर्ग जिल्हा पतंजली योग समितीतर्फे सावंतवाडी शहरात गुरुवार, ५ ते ९ डिसेंबर दरम्यान पाच दिवसीय संयुक्त योगोपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सावंतवाडी गवळी तिठा येथील वैश्य भवन येथे सकाळी ५.३० ते ७.३० या वेळेत हे शिबीर होणार आहे.
शिबिरात सूर्यनमस्कार, प्राणायाम, योगासने, अॅडव्हान्स योग, आयुर्वेद तसेच योगोपचार आणि आध्यात्मिक उन्नतीबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. शिबिरात मधुमेह, रक्तदाब, लठ्ठपणा, सांधेदुखी, हृदयविकार या व्याधींच्या निवारणासाठीही विशेष मार्गदर्शन करण्यात येणार आहे. शिबिराचा योगाभ्यासप्रेमी, पुरुष, महिला तसेच लहान मुलांनी लाभ घ्यावा. शिबिराच्या अधिक माहितीसह नाव नोंदणीसाठी शेखर बांदेकर ९८२३८८१७१२ आणि महेश भाट यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा पतंजली योग समितीतर्फे रामनाथ सावंत आणि अनिल मेस्त्री यांनी केले आहे.