*कोंकण Express*
*राज्य स्तरीय योगासन स्पर्धेत दीपा नारकर हिला विजेते पदाचा सन्मान*
*राष्ट्रीय योगासन स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून निवड*
*कासार्डे : प्रतिनिधी*
महाराष्ट्र योगासना स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आलेल्या ४१ व्या महाराष्ट्र राज्य स्तरीय योगासन स्पर्धा २०२४ या राज्यस्तरीय योगासन चॅम्पियन स्पर्धेत दीपा नारकर-गवंडळकर हीने आपला वरचष्मा कायम राखत दैदिप्यमान सुयश मिळविले आहे. या स्पर्धेत तिने पहिला क्रमांक पटकावित विजेतेपदाचा सन्मान मिळावा आहे. आता तिची राष्ट्रीय योगासन स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तिच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.
ही योगासन स्पर्धा विविध वयोगटातील स्पर्धकांसाठी आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेतील ४६ ते ५५ वर्षे वयोगटात तिने अंतिम फेरीत धडक मारत अंतिम विजेते पदावरती आपले नाव कोरले आहे. या तिच्या उत्कृष्ट कामगिरी बद्दल तिला गोल्ड मेडल, चषक आणि प्रशस्तिपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. या स्पर्धेतील सुयशानंतर तिची राष्ट्रीय योगासन स्पर्धेसाठी राज्यातून निवड झाली आहे.
दीपा यांच्या दमदार कामगिरी बद्दल आणि तिच्या सातत्यपूर्ण यशाबद्दल मैत्री परिवाराच्या वतीने अभिनंदन करण्यात आले व पुढील राष्ट्रीय योगासन स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. दीपा नारकर ह्या फणसगावचे सुपुत्र आणि भारतीय सैन्य दलातील सुभेदार मेजर पदावरती कार्यरत असणारे शशिकांत शांताराम नारकर यांच्या सौभाग्यवती आहेत. तसेच त्या कणकवली काॅलेज मधील सन १९९५-९६ सालच्या बीकाॅम बॅच मधील मैत्री परिवाराच्या सदस्या आहेत. सध्या त्या पुण्यात स्थायिक असून पुण्यात पतंजली योग समितीच्या माध्यमातून योगाचा प्रसार आणि प्रचार करण्याचे कार्य करीत आहेत. त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.