*कोंकण Express*
*रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा मानून रुग्णालयाला फॅन ची भेट*
*सावंतवाडी : प्रतिनिधी*
सावंतवाडी शहरातील दानशूर व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाणारे महालक्ष्मी भोजनालयाचे मालक राजू भालेकर व सुधीर उर्फ नारायण पोकळे तर किरण हळदणकर यांच्या शिफारशीमुळे प्रफुल्लचंद्र सांगोडकर स्टेट बँक ऑफ इंडिया निवृत्त वरिष्ठ अधिकारी या सर्वांनी मिळून जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांच्या जवळ सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात अतिदक्षता विभागामध्ये स्टॅण्ड फॅन बसवण्यासाठी तब्बल तिघांनी मिळून प्रत्येकी दहा दहा हजार असे तीस हजार रुपये किमतीचे स्टॅन्ड फॅन राजू मसुरकर यांच्याजवळ सुपूर्त करुन सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाला हे फॅन वस्तू स्वरूपात भेट देण्यात आली.
यामुळे गोरगरीब रुग्णांसाठी जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर व सामाजिक बांधिलकीचे संयोजक रवी जाधव व आणि त्याची सहकारी टीम नेहमीच कार्यरत असतात नवीन अतिदक्षता विभाग हा पूर्णपणे बंदिस्त असल्याने एखाद्या वेळी अतिदक्षता मधील सेंट्रल एसी बंद पडल्यास त्यामुळे रुग्णांना उकाड्यामुळे शारीरिक व मानसिक त्रास होऊ नये.याकरिता नऊ स्टँड फॅन त्या ठिकाणी बसवण्यात येणार आहेत.
सतत गोरगरीब रुग्णांची काळजी घेणारे जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर तसेच सामाजिक बांधिलकीचे संयोजक रवी जाधव व रुपा मुद्राळे समीरा खलील व सामाजिक बांधिलकीचे अध्यक्ष सतीश बागवे कार्याध्यक्ष संजय पेडणेकर व उपाध्यक्ष शैलेश नाईक त्यांची सहकारी संयोजक टीम यांच्या मागणीनुसार अतिदक्षता विभागामध्ये आवश्यक असणारी वस्तू देऊन नऊ स्टॅन्ड फॅन प्राप्त झाले आहेत.
अशावेळी सामाजिक कार्यकर्ते राजू मसुरकर यांनी आपल्या भावना व्यक्त करताना म्हणाले माझ्या राजकीय व सामाजिक जीवनात मी पहिल्यांदाच असा व्यक्ती पाहिला तो म्हणजे एका ऑटोमोबाईल स्पेअर पार्ट च्या दुकानांमध्ये नियुक्त असणारा कर्मचारी सुधीर उर्फ स्वामी नारायण पोकळे सारख्या एका सर्वसामान्य व्यक्तींने काटकसर करून ठेवली दहा हजार रुपये एवढ्या किमतीचे देणगी स्वरूपात स्टॅन्ड फॅन दिले आहेत त्याचीही तीन स्टँड फॅन देण्याची इच्छुक भावनेमुळे मी भारावून गेलो आहे ईश्वर त्याला व त्याच्या कुटुंबीयांना आरोग्य आयुष्य ऐश्वर्य लाभो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.
ह्या एका व्यक्तीच्या उदाहरणावरून वरील दिलेल्या दानशूर व्यक्तीमुळे सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय मध्ये असलेली समस्या दूर होऊ शकते यासाठी सर्व जिल्ह्यातील नागरिकांनी आपापल्या ग्रामीण रुग्णालय प्राथमिक रुग्णालय उपजिल्हा रुग्णालय व जिल्हा रुग्णालय आपापल्या भागामध्ये पैसे न देता आपल्या गावातील मित्र मंडळा मार्फत वस्तू स्वरूपात देणगी दिल्यास येणारे गोरगरीब रुग्णांना दिलासा मिळू शकतो असे मत जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते राजु मसुरकर यांनी व्यक्त केले आहे.