*कोंकण Express*
*अपंग दिनानिमित्त अपंग बांधवांच्या आर्थिक सक्षमीकरण्यासाठी बँक शिबिराचे आयोजन :-वैष्णवी मोंडकर*
*मालवण : प्रतिनिधी*
दिनांक 3 डिसेंबर हा जागतिक अपंग दिन म्हणून साजरा केला जातो या दिनाचे औचित्य साधून मातृत्व वरदान फाऊंडेशन च्या माध्यमातून सिंधुदुर्ग दिव्यांग संस्था आणि बँक ऑफ बडोदा च्या सहकार्याने अपंग बांधवाच्या आर्थिक सक्षमीकारणासाठी बँकिंग शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.मंगळवार दिनांक 3/12/2024 रोजी सकाळी 10.30 वाजता हॉटेल श्री महाराज येथे सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
अपंग बांधवाना अपंगत्व हे जन्मतः किंवा अपघाताने आले असून त्यांच्या व्यावहारिक जीवनात या अपंगत्वामुळे अनेक आर्थिक अडचणींना सामोरं जावे लागत असते यांचा विचार करून त्यांना आर्थिक सक्षमता प्राप्त होण्यासाठी तसेच आर्थिक स्तर उंचावण्यासाठी बँकिंग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.या माध्यमातून शासनाच्या विविध कर्ज योजना त्यांची माहिती बँक ऑफ बडोदा चे मालवण शाखा अधिकारी श्री रोहन पाटील उपस्थित राहून देणार आहेत.
अपंग बांधवानी व्यवसाय उभा करण्यासाठी येणाऱ्या अडचणी,प्रकल्प अहवाल कागद पत्र जमा करण्यासाठीही मातृत्ववरदान फाऊंडेशन तर्फे पुढील काळातही मदत केली जाणार असून आपल्या राहत्या भागात विविध व्यवसायांच्या माध्यमातून आर्थिक सक्षमता प्राप्त करण्यासाठी अपंग बांधवानी या शिबिरात उपस्थित राहावे या कार्यक्रमास अपंग बांधवानी उपस्थित राहण्याचे आवाहन वैष्णवि मोंडकर अध्यक्ष मातृत्व वरदान फाऊंडेशन तसेच सत्यम पाटील सिंधुदुर्ग दिव्यांग संस्था,विनोद धुरी अध्यक्ष काळसे पंचक्रोशी अपंग संस्था तसेच बँक ऑफ बडोदा यांच्या माध्यमातून करण्यात येत आहे.