*कोंकण Express*
*विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेत गोवा सायन्स सेंटर मार्फत विज्ञान सहल*
*कासार्डे : प्रतिनिधी*
विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेत सावंत फौंडेशन संचलित गोवा विज्ञान केंद्रामार्फत विज्ञान सहल हा विज्ञान विषयाच्या अभिरूची संपन्नतेसाठी विज्ञानाची अभिनव संकल्पना घेऊन विज्ञान जागृतीचा उपक्रम प्रशालेत घेण्यात आला.या कार्यक्रमाचे उद्गाटन शिक्षण प्रसारक मंडळाचे विश्वस्त आदरणीय अनिल डेगवेकर साहेब यांच्या हस्ते झाले.विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना विज्ञान आणि मानवी जीवन या विषयी सुंदर शब्दांत माहिती कथन करून शुभेच्छा दिल्या .
प्रशालेचे मुख्याध्यापक श्री पी जे कांबळे सरांनी विज्ञान प्रात्यक्षिक आणि निरिक्षण शक्ती तसेच सावंत फौडेशन यांचे विज्ञान संशोधनाचे कार्य गोवा सायन्स सेंटेरचे विज्ञान विषयक दृष्टिकोन विज्ञान सामान्य व्यक्तींपर्यंत पोहचवून अभिरूची निर्माण करण्याची शक्ती आणि प्रेरणा निर्माण करून प्रोत्साहन दिले.गोवा सायन्स सेंटरचे मार्गदर्शक यांनी विज्ञान संशोधनाचे महत्व विषद करून विज्ञान केंद्रात असणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली.
या कार्यक्रमाचे निवेदन विज्ञान शिक्षिका शर्मिला केळुसकर मॅडम यांनी केले.विज्ञान सहल या वैविध्य पूर्ण कार्यक्रमास प्रशालेतील जेष्ठ शिक्षक अच्युतराव वणवे सर पर्यवेक्षिका वृषाली जाधव मॅडम सर्व विद्यार्थी शिक्षक उपस्थित होते.या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन व सहकार्य सावंत फौंडेशनचे प्रमुख शरद सावंत यांनी केले.आधार विज्ञान विभाग प्रमुख पृथ्वीराज बर्डे सरांनी मांडले .