*कोंकण Express*
*वारगाव विकास मंडळाने नवनिर्वाचित आमदार अनंत नर यांचे केले अभिनंदन*
*कासार्डे : प्रतिनिधि*
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वारगांव गावचे सुपुत्र अनंत (बाळा) नर यांची जोगेश्वरी मधून आमदारपदी निवड झाल्याबद्दल वारगांव विकास मंडळ मुंबई यांच्याकडून अभिनंदन करत शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी वारगाव विकास मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.
वारगाव विकास मंडळाचे त्यांनी अनेक वर्षे सरचिटणीस म्हणून यशस्वी कामगिरी बजावली होती. तसेच, मुंबई येथेही अनेक वर्षे नगरसेवक म्हणून उत्तम कार्य सुरू होते. वारगाव विकास मंडळाच्या माध्यमातून त्यांनी वारगाव गावातही खूप चांगले काम केले आहे. या त्यांच्या कार्यामुळे वारगाव विकास मंडळाने मुंबई येथे भेट घेत शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देत अभिनंदन करुन शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी वारगांव विकास मंडळ मुंबईचे अध्यक्ष विजय केसरकर, उपाध्यक्ष सुरेश मेस्त्री, सरचिटणीस प्रथमेश राऊत, चिटणीस शत्रुघ्न धनावडे, तसेच वारगांव विकास मंडळ सदस्य सुधाकर नर, विश्वनाथ नर, जनार्दन कानकेकर, रमेश प्रभू, धोंडूराम राऊत, अनंत हरियाण, आत्माराम नर, संतोष नर उपस्थित होते.