फोंडाघाट एज्यु.महविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची प्रा.मधु दंडवते वाचनालयाला अभ्यास भेट

फोंडाघाट एज्यु.महविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची प्रा.मधु दंडवते वाचनालयाला अभ्यास भेट

*कोंकण Express*

*फोंडाघाट एज्यु.महविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची प्रा.मधु दंडवते वाचनालयाला अभ्यास भेट*

*कणकवली : प्रतिनिधी*

फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीच्या कला व वाणिज्य महाविद्यालयातील इंग्रजी साहित्याचा विद्यार्थ्यांनी भारतीय संविधान दिनाचे औचित्य साधून येथील प्रा मधु दंडवते ग्रंथालय व वाचनालयास अभ्यास भेट दिली.

साहित्य हे जीवनाचा आरसा असते, तसेच ते जीवनाला योग्य दिशा व वळण देत असते. साहित्यिक आपल्या जीवनातील अनुभव पुस्तकाच्या रूपाने वाचकांसमोर ठेवत असतो. आणि त्या अनुभवांचे वाचन करून वाचक आपल्या जीवनात योग्य वाटचाल करत असतो. तर वास्तववादी साहित्य समाजातील व्यंग व वाईट गोष्टीवर प्रहार करून योग्य जीवनमार्ग काय आहे, हे दाखवून देण्याचा प्रयत्न करते. मराठी, इंग्रजी अथवा हिंदी भाषेतील साहित्य हे समाज प्रबोधन व मनोरंजन या दोन्ही अंगाने उपयोगी असते. असे प्रतिपादन विभाग प्रमुख प्रा संतोष आखाडे यांनी केले.

कोकणातील ज्येष्ठ विचारवंत प्रा मधु दंडवते यांच्या नावाने सुरू केलेले हे वाचनालय हे एक अप्रतिम स्मारक असल्याचे ग्रंथपाल सौ दीक्षा नेरूरकर यांनी सांगितले. दिवसेंदिवस ग्रंथालयातील पुस्तकांची संख्या व वाचकांची संख्या वाढत असल्याचे त्यांनी सांगितले. पुस्तकांची देवघेव कशा पद्धतीने केली जाते याविषयी सविस्तर माहिती त्यांनी विद्यार्थ्यांना दिली. तसेच विद्यार्थ्यांनी विचारलेल्या शंकांचे सविस्तर विवेचनही त्यांनी केले.

या अभ्यासपूरक उपक्रमाचे आयोजन प्राचार्य डॉ पुरंधर नारे यांच्या मार्गदर्शनाखाली इंग्रजी साहित्याचे विद्यार्थी व प्रा संतोष आखाडे व प्रा विनोदसिंह पाटील यांनी केले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!