गणेश मुर्तीकारांना सिंधूरत्न योजनेतून अर्थसहाय्य मिळणार कधी ? – मुर्तीकार गुरूदास गवंडे

गणेश मुर्तीकारांना सिंधूरत्न योजनेतून अर्थसहाय्य मिळणार कधी ? – मुर्तीकार गुरूदास गवंडे

*कोंकण Express*

*गणेश मुर्तीकारांना सिंधूरत्न योजनेतून अर्थसहाय्य मिळणार कधी ? – मुर्तीकार गुरूदास गवंडे*

*बांदा : प्रतिनिधी*

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गणेश मूर्तीकरांनी आपले १८३९ अर्ज प्रत्येक तालुक्यातून पंचायत समिती मार्फत जिल्हा परिषद ला प्रशासनाला सादर केले होते परंतु आज सावंतवाडी गटविकास अधिकारी पंचायत समिती श्री. वासुदेव नाईक यांची भेट घेतली असता अजून पर्यंत सिंधू रत्न योजनेतून कोणतेही अर्थसहाय्य गणेश मूर्तिकार यांना प् अद्याप पर्यंत पंचायत समितीकडे मंजूर झाले नाही असे आम्हाला सांगण्यात आले असे गणेश मुर्तीकार गुरुदास गवंडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले.

एका दैनिक वृत्तपत्राच्या मथळ्याखाली २६ नोव्हेंबर २०२४ रोजी गणेश मूर्तिकारांना मिळणार अर्थसहाय्य १५०० लाभार्थी आचारसहितेमुळे रखडली होती प्रक्रिया अशा बातम्या प्रसिद्ध होत आहेत आणि गणेश मूर्तिकार हे तालुकास्तरावर जाऊन या संदर्भात पाठपुरावा विचारपूस करत आहेत परंतु आम्ही जिल्हा परिषद सिंधुदुर्ग उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. विशाल तनपुरे यांच्याशी भ्रमणीद्वारे संपर्क साधला असता अजून पर्यंत अर्थसाह्य मंजूर झाले नाही असे त्यांनी सांगितले .त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्या लाभार्थ्यांनी सिंधू रत्न योजनेत अर्ज सादर केले. त्यांना अनुदान मंजूर झाले नाही आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गणेश मूर्तिकारांच्या गणपती शाळा सक्षमी करण्यासाठी मंजूर ३ कोटी निधीतून सन २४-२५ आर्थिक वर्षामध्ये मधून जिल्ह्यातील १५०० लाभार्थींना माती मळणी यंत्र, कलर गन यासाठी अर्थसहाय्य दिले जाणार आहे. याकरिता ग्रामपंचायत स्तरावर दिनांक १० ऑगस्ट२०२४ पूर्वी प्रत्येक गावनिहाय ग्रामपंचायत मार्फत अर्ज सादर करण्याचे काम जिल्हा प्रशासन ने केले होते .त्यांची अद्याप पर्यंत यादीही पंचायत समिती पर्यंत पोचली नाही याची नोंद सर्व गणेश मूर्तिकार यांनी घ्यावी.

घाई गडबडीत आचारसंहिता लागण्यापूर्वी व ऐन गणपती शाळांमध्ये मूर्तिकारांचे काम चालू असताना मूर्तिकाऱ्यांनी मोठ्या अपेक्षेने फॉर्म भरले होते आणि आपल्याला कुठेतरी याचा लाभ मिळेल म्हणून प्रयत्न केले होते परंतु अद्याप पर्यंत सदर अनुदान मंजूर नसून आता येणाऱ्या नवीन सरकारने हा गणेश मूर्तिकारांचा विषय तातडीने सोडवावा अशी मागणी गणेश मूर्तिकार श्री गुरुदास गवंडे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!