डामरे गावचे आराध्य दैवत श्री देव गांगो अनभवानी मातेचा २ डिसेंबर ला जत्रोत्स

डामरे गावचे आराध्य दैवत श्री देव गांगो अनभवानी मातेचा २ डिसेंबर ला जत्रोत्स

*कोंकण Express*

*डामरे गावचे आराध्य दैवत श्री देव गांगो अनभवानी मातेचा २ डिसेंबर ला जत्रोत्सव*

*कणकवली : प्रतिनिधी*

शिर्डी चे साईबाबा यांच्यानंतर पाचशेर पाणी जाळणाऱ्या डामरे गावचे आराध्य दैवत श्री देव गांगो अनभवानी मातेचा वार्षिक जत्रोत्सव २ डिसेंबर रोजी संपन्न होत आहे. या जत्रेला मोठया प्रमाणात महाराष्ट्रातून भाविक येतं असतात. या यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे शिवकालीन असणारी भवानी लोकांना अनुभव द्यायला लागली म्हणून ती अनभवानी या नावाने नावा रूपाला आली.

या अनभवानी माता यात्रे दिवशी पाचशेर पाणी कोहळ्यात ओतून पेटविले जाते. या यात्रेच्या दुसऱ्या दिवशी देव तरंग अनभवानी मातेच्या उगम स्थानाकडे गाव सवारी घेऊन जात असतात. तर नंतर कानडेवाडी येथे असणाऱ्या ब्राह्मणाची भेट घेतल्यावर देव तरंग देवळांत जात असतात, अशी पूर्ण प्रदक्षिणा झाल्यावर तिसऱ्या दिवशी यात्रा समाप्त होते. या यात्रेला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन डामरे ग्रामस्थ मंडळ व मुंबई यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!