*कोंकण Express*
*जिल्हास्तरीय युवा महोत्सवात वराडकर हायस्कुलच्या विद्यार्थिनींचे यश*
*मालवण : प्रतिनिधी*
जिल्हास्तरीय ‘युवा महोत्सव २०२४’ मध्ये कट्टा येथील वराडकर हायस्कूलच्या ममता आंगचेकर हिने हस्तकला स्पर्धेत तृतीय तर चित्रकला स्पर्धेत श्रेया चांदरकर हिने तृतीय क्रमांक मिळविला.
जिल्हास्तरीय युवा महोत्सव ओरोस येथील जिल्हा नियोजन समिती सभागृहात पार पडला. या महोत्सवांतर्गत विविध स्पर्धा पार पडल्या. यात हस्तकला स्पर्धेत ममता आंगचेकर हिला तृतीय व चित्रकला स्पर्धेत श्रेया चांदरकर हिला तृतीय क्रमांक प्राप्त झाला. जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन विजेत्यांना सन्मानित करण्यात आले. व्यासपीठावर उपजिल्हाधिकारी शारदा पवार, भूसंपादन अधिकारी आरती देसाई, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत, जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस उपस्थित होत्या.
या विद्यार्थ्यांना कलाशिक्षक समीर चांदरकर यांनी मार्गदर्शन केले. या यशाबद्दल वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुख्याध्यापिका देवयानी गावडे, कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे विश्वस्त अॅड. एस. एस. पवार, कर्नल शिवानंद वराडकर, अध्यक्ष अजयराज वराडकर, उपाध्यक्ष आनंद वराडकर, शेखर पेणकर, संस्था सचिव सुनील नाईक, विजयश्री देसाई, खजिनदार रवींद्र पावसकर, शालेय समिती अध्यक्ष सुधीर वराडकर, सहसचिव एस. डी. गावडे व सर्व संचालक मंडळाने अभिनंदन केले.