*कोंकण Express*
*सुनील तळेकर ट्रस्टचे लोकोपयोगी काम आश्वासक : डॉ. मिलिंद कुलकर्णी*
*रक्तदान शिबिरात 37 दात्यांचे रक्तदान : महिलांचा मोठा सहभाग*
*कासार्डे : प्रतिनिधी*
जिल्ह्यातील काही मोजक्या संस्थांपैकी तळेरे येथील स्व. सुनील तळेकर चॅरिटेबल ट्रस्टचे काम लोकोपयोगी आणि आश्वासक आहे. आपल्या कामात सातत्य ठेवत सर्वसमावेशक उपक्रम राबविणाऱ्या या ट्रस्टचे आणि सर्व कार्यकर्त्यांचे प्रामाणिक प्रयत्न त्यामागे असून आजचे रक्तदान हे शिबिर हा अत्यंत महत्वाचा उपक्रम आहे, असे प्रतिपादन डॉ. मिलिंद कुलकर्णी यांनी केले. ते तळेरे येथे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलत होते.
तळेरे येथील स्व. सुनील तळेकर चॅरिटेबल ट्रस्ट, सुनील तळेकर सार्वजनिक वाचनालय व विजयालक्ष्मी विश्वनाथ दळवी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आणि जिल्हा रक्तपेढी ओरोस यांच्या सहकार्याने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात एकूण 37 रक्तदात्यांनी रक्तदान केले. या शिबिराचे उद्घाटन डॉ. मिलिंद कुलकर्णी यांच्या हस्ते स्व. सुनील तळेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि दीपप्रज्वलन करून करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर माजी जिल्हा परिषद सदस्य रवींद्र जठार, कणकवली माजी सभापती दिलीप तळेकर, ट्रस्टचे अध्यक्ष सुरेश तळेकर, उपाध्यक्ष चंद्रकांत तळेकर, वाचनालयाचे अध्यक्ष राजू वळंजू, सदस्य डॉ. अभिजीत कणसे, तळेरे माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक अविनाश मांजरेकर, तळेरे पोलिस पाटील चंद्रकांत जाधव, श्रीनिवास पळसुले, अशोक तळेकर, जिल्हा रक्तपेढीचे पवन लोखंडे आदी मान्यवर उपस्थित होते.
गावात एक चांगली शैक्षणिक संस्था असली की सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांना बहर येतो. ते सांस्कृतिक केंद्रबिंदू ठरते. तशाच प्रकारचे काम तळेरे येथील दळवी महाविद्यालय सातत्याने करत आहे.
यावेळी राजू वळंजू यांनी मनोगत व्यक्त केले. प्रारंभी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. हेमंत महाडिक तर आभार मिनेश तळेकर यांनी मानले. यावेळी प्रा. हेमंत महाडिक, निलेश तळेकर, शैलेश सुर्वे, वाचनालयाचे सचिव मिनेश तळेकर, निकेत पावसकर, दिनेश मुद्रस, सौ. श्रावणी मदभावे, सौ. साक्षी तळेकर, संज्योत नांदलस्कर यांच्यासह दळवी महाविद्यालयाचे विद्यार्थी आणि जिल्हा रक्तपेढीचे प्रांजली परब, मयुरी शिंदे, नेहा परब, नितीन गावकर, नंदकुमार आडकर आदी उपस्थित होते.