*कोंकण Express*
*कासार्डे माध्यमिक विद्यालयाच्या माजी विद्यार्थी मित्रपरिवारातर्फे दिविजा वृध्दाश्रमाला अत्यावश्यक वस्तूंची देणगी*
*कासार्डे : प्रतिनिधी*
कासार्डे माध्यमिक विद्यालयाच्या माजी विद्यार्थी मित्रपरिवारातर्फे असलदे (ता. कणकवली) येथील दिविजा वृद्धाश्रमातील जवळपास ५० वृद्धांना अत्यावश्यक वस्तूस्वरूपात मदत करण्यात आली. त्यामध्ये साधारण ५० बेडशीट, उशी कव्हर, टाॅवेल्स तसेच नॅपकीन इ. साहित्य होते. या मित्रपरिवाराकडून विविध सामाजिक उपक्रमही राबविले जातात.
समाजाचेही आपण काहीतरी ऋण लागतो, त्याची काही अंशी का होईना परतफेड करावी हाच एक सामाजिक उद्देश बाळगून सदर मदत करण्यात आली. यावेळी वृद्धाश्रमाचे संचालक संदेश शेट्ये यांनी सर्वांचे स्वागत केले. तसेच वृद्धाश्रमात सध्या चालू असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. कामावि मित्रपरिवारतर्फे अविनाश वाडये यांनी परिवारातर्फे आतापर्यंत राबवत असलेल्या शैक्षणिक, सांस्कृतिक तसेच सामाजिक उपक्रमांची तसेच करीत असलेले कार्य याबद्दल सविस्तर माहिती सांगितली. तसेच भविष्यात जर काही वृद्धाश्रमाला काही मदत लागली, गरज पडली तर अगदी आवर्जून कळवाच. आम्ही आमच्या परीने योग्य ती मदत नक्कीच करू असेही सांगितले.
यावेळी संदेश शेट्ये यांनी ग्रूपतर्फे आलेल्या मदतीचा अत्यंत आनंदाने स्वीकार केला आणि सर्व वृद्धांतर्फे ग्रूपचे आभार मानले. तुमची साथ अशीच सदैव राहूद्या असेही अत्यंत आग्रहपूर्वक सांगितले. यावेळी गुरुनाथ नकाशे, नारायण पाताडे, शांताराम पारकर, बाबू राणे, अविनाश वाडये ही मंडळी आपला अमूल्य असा वेळ देऊन हजर होतीच. या सर्वांच्या सहकार्याने हा उपक्रम अत्यंत छानपणे पार पडला.