*कोकण Express*
*पियाळी शिवमहोत्सव समितीतर्फे उद्या शिवमहोत्सव*-
*सभापती रावराणे, जि.प. सदस्य संजय आंग्रे, कवी अजय कांडर, कवी मातोंडकर, सरपंच गुरव यांची उपस्थिती*
*कणकवली ः प्रतिनिधी*
शिवमहोत्सव आयोजन समिती पियाळीतर्फे शुक्रवार 19 फेब्रुवारी रोजी दिवसभर विविध कार्यक्रमातून सभापती मनोज रावराणे, जि. प. सदस्य संजय आंग्रे, कवी अजय कांडर, समाज साहित्य संघटनेचे जिल्हाध्यक्ष मधुकर मातोंडकर, पियाळी सरपंच पवित्रा गुरव यांच्या प्रमुख उपस्थितीत कोविडचे सर्व नियम पाळत तिसऱ्या शिवमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
शिवमहोत्सवाचे उद्घाटन स. 10 वा. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आप्पा नारकर यांच्या हस्ते होणार असून उद्घाटन सत्रानंतर स. 10:30 वा. मुलांची भाषणे, दु. 2 वा. सम्मोहन कार्यक्रम, सायं 5 वा. मिरवणूक, सायं. 6 वा. डिजिटल प्रश्नमंजुषा आदी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
रात्री 9 वा.कवी अजय कांडर यांचे ‘ शिवाजी महाराज यांचे विचार आणि त्याचे अनुकरण’ या विषयावर व्याख्यान होणार असून
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सभापती रावराणे, श्री आंग्रे, सरपंच गुरव, कवी मातोंडकर उपस्थित राहणार आहेत. व्याख्यानानंतर राज्यस्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. तरी या शिवमहोत्सवात शिवप्रेमींनी सहभागी व्हावे असे आवाहन शिवमहोत्सवाचे अध्यक्ष रितेश तांबे, सेक्रेटरी प्रतीक्षा सुतार यांनी केले आहे.