*कोंकण Express*
*आरवलीच्या प्रसिद्ध “श्री देव वेतोबा”चा जत्रौत्सव २ डिसेंबरला*
*वेंगुर्ला : प्रतिनिधी*
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध आरवली येथील श्री.वेतोबा देवाचा वार्षिक जत्रोत्सव सोमवार दिनांक ०२ डिसेंबर २०२४ रोजी होणार आहे.यानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
जत्रोत्सवा दिवशी रात्री श्रींची पालखी, दारु-सामान आणि फटाक्यांची आतषबाजी व दशावतारी नाट्यप्रयोगही होणार आहे.तर दुस-या दिवशीही मंगळवार दिनांक ०३ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी तुलाभार, गुणिजन गायन गौरव कार्यक्रम होणार आहे. याच दिवशी श्री देवी सातेरीचाही वार्षिक जत्रोत्सव असल्यामुळे तिथेही रात्री देवीची पालखी प्रदक्षिणा, दारुसामान आतषबाजी व दशावतारी नाटक यांचे आयोजन केलेले आहे. तरी भाविकांनी या दोन्ही जत्रोत्सवा मध्ये उपस्थित राहून देवतांचा आशीर्वाद घ्यावा असे आवाहन श्री देव वेतोबा देवस्थान कमिटी, आरवली यांनी केले आहे.