रेडी येथे ३० नोव्हेंबरला ‘एक दीप भारतमातेच्या वीर जवानांसाठी’ कार्यक्रमाचे आयोजन

रेडी येथे ३० नोव्हेंबरला ‘एक दीप भारतमातेच्या वीर जवानांसाठी’ कार्यक्रमाचे आयोजन

*कोंकण Express*

*रेडी येथे ३० नोव्हेंबरला ‘एक दीप भारतमातेच्या वीर जवानांसाठी’ कार्यक्रमाचे आयोजन*

*वेंगुर्ला : प्रतिनिधी*

स्वयंभू श्री देवी माऊलीच्या वार्षिक जत्रोत्सवाचे औचित्य साधून कार्तिक अमावस्या ३० नोव्हेंबरला सायंकाळी ६ वाजल्यानंतर श्री सप्तेश्वर (स्वयंभू) महादेव मंदिर, रेडी येथे १००१ दीप प्रज्वलित करून गावातील सामाजिक ऐक्य व बांधिलकी जपण्याचे उद्दिष्ट ठेवून “दीपोत्सव २०२४” कार्यक्रमाच्या नियोजन करण्यात आले आहे.

दिपोत्सव या कार्यक्रमात भारतमातेच्या शहिद झालेल्या वीर जवानांकरिता आदरांजली म्हणून “एक दीप भारतमातेच्या वीर जवानांसाठी ” दीप प्रज्वलित करण्यात येणार आहे. दीपोत्सवाचे यंदाचे आठवे वर्ष असून ह्या कार्यक्रमात स्वयंभू श्री सप्तेश्वर महादेवाच्या मंदिरात सुवासिनी स्त्रियांकडून पूजन करून नंतर संपूर्ण मंदिराला दिव्यांनी सजवून आपल्या भारत मातेच्या रक्षणासाठी अविरत लढणा-या व लढता लढता शहिद झालेल्या वीर भारतीय जवानांसाठी दीपोत्सवाच्या माध्यमातून आदरांजली वाहण्यात येणार आहे.

हा कार्यक्रम हा सतर्क पोलीस टाईम्स, अखिल भारतीय भंडारी समाज महासंघ व कै. राजन बापू रेडकर मित्रपरिवार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येत आहे. तरी सर्व नागरिकांनी ह्या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!