*कोंकण Express*
*परुळेत २ फेब्रुवारीला हाफ मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन*
* कुडाळ : प्रतिनिधी*
सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या राधारंग फाऊंडेशनने २ फेब्रुवारी २०२५ रोजी हाफ मॅरेथॉनचे आयोजन केले आहे. यंदाचे हे चौथे वर्ष असून यावर्षी पाच, दहा आणि २१ किमी. च्या हाफ मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. या मॅरेथॉनमध्ये कोणत्याही वयोगटाचे स्त्री-पुरुष सहभागी होऊ शकतात.
यात नावनोंदणी करून सहभागी होणाऱ्यांना टी-शर्ट देण्यात येणार असून निवडलेले अंतर पूर्ण करणाऱ्यास पदक देण्यात येणार आहे. सर्व सहभागींना दरम्यान पाणी, ओआरएस, वैद्यकीय मदत् देण्यात येणार असून प्रशिक्षित स्टाफसह दोन रुग्णवाहिका उपलब्ध असणार आहेत. तसेच ज्यांना गरज असेल, त्यांच्यासाठी फिजिओथेरपीची सेवा उपलब्ध असणार आहे.
ही मॅरेथॉन परुळे हायस्कूल येथून सुरू होणार आहे. मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी लिंकद्वारे ऑनलाईन नावनोंदणी करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी गोपाळ राऊळ, मोबा-८०१०४६८५६५ यांच्याशी संपर्क साधावा. २० जानेवारीपूर्वी नावनोंदणी करणाऱ्यांनाच प्रवेश दिला जाणार आहे.