परुळेत १४ जानेवारीला भावगीत गायन स्पर्धा

परुळेत १४ जानेवारीला भावगीत गायन स्पर्धा

*कोंकण Express*

*परुळेत १४ जानेवारीला भावगीत गायन स्पर्धा*

*वेंगुर्ला : प्रतिनिधी*

राधारंग फाऊंडेशन पुरस्कृत व युवक कला-क्रीडा मंडळ (परुळे) च्यावतीने जिल्हास्तरीय भावगीत गायन स्पर्धेचे आयोजन १४ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजता येथील श्री देव आदिनारायण मंदिराच्या रंगमंचावर करण्यात आले आहे.

प्रथम क्रमांक तीन हजार रु. व स्मृतिचिन्ह, द्वितीय अडीच हजार रु. व स्मृतीचिन्ह, तृतीय दोन हजार रु. व स्मृतीचिन्ह, उत्तेजनार्थ एक हजार रु. व स्मृतीचिन्ह देण्यात येणार आहे. या स्पर्धेत अठरा वर्षांवरील स्त्री- पुरुष सहभागी होऊ शकतात. ५ जानेवारीपर्यंत प्रथम नावनोंदणी करणाऱ्या बारा स्पर्धकांची निवड करण्यात येणार आहे. नावनोंदणीसाठी ‘डॉ. प्रशांत सामंत, मोबा-९४२३३१८२३१ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!