*कोंकण Express*
*वेंगुर्ले कॅम्प येथील स्नॅक्स सेंटर तात्काळ सुरू करण्याची मागणी*
*वेंगुर्ला : प्रतिनिधी*
नगरपरिषदेने मोठा गाजावाजा करून कॅम्प-घोडेबांव गार्डन येथे सुरू केलेले स्नॅक्स सेंटर थोड्याच दिवसांत बंद पडले आहे. प्रशासनाचा याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते अॅड. मनिष सातार्डेकर यांनी केला आहे. आणि तात्काळ हे स्नॅक्स सेंटर सुरू करावे, अशी मागणी केली आहे.
नगरपरिषदेने या स्नॅक्स सेंटरच्या उभारणीसाठी लाखो रूपये खर्ची घातले असून सध्या ते धूळखात पडले आहे. तशीच परिस्थिती वॉटर एटीएम मशिनबाबत झाली आहे. तर दुसरीकडे घोडेबाव गार्डनच्या गडग्यावर तारेचे कुंपण केल्याने गार्डनची दयनीय अवस्था झाली आहे.
नगरपरिषद लाखो रूपये विविध उपक्रमांवर खर्च करते आणि सातत्य ठेवत नाही. त्यामुळे पैशाची हानी होते. बंद असलेले स्नॅक्स सेंटर तात्काळ सुरू करण्याबाबत योग्य त्या उपाययोजना कराव्यात तसेच घोडेबांव गार्डनमधील झाडांची देखील योग्यप्रकारे करावी, असे सातार्डेकर यांनी सुचित केले आहे.