*कोकण Express*
*जिल्ह्यात शेती व पशुपालनातून समृद्धी नांदेल ; उद्योजक संजय किर्लोस्कर*
*कणकवली ः प्रतिनिधी*
सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान, कृषी विज्ञान केंद्र किर्लोस येथील विज्ञान केंद्राच्या रौप्य महोत्सवाला आलेल्या किर्लोसकर उद्योग समूहाचे अध्यक्ष संजय किर्लोसकर व त्यांचा मुलगा आलोक किर्लोसकर यांनी पशुसंवर्धन विभागाच्या स्टॉलला भेट दिली. यावेळी पशुसंवर्धन विभागाच्यावतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले. तसेच शेती विषयक आणि पशुसंवर्धन विषयक आधुनिक तंत्रज्ञानाची शेतकऱ्यांना दिली जाणारी माहिती जाणून घेतली. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणाऱ्या विविध योजना व इतर माहितीतून जिल्ह्यात शेती व पशुपालनातून समृद्धी नांदेल असा विश्वास व्यक्त करत उद्योजक संजय किर्लोस्कर यांनी समाधान व्यक्त केले.
शेतकऱ्यांना शेती विषयक आणि पशुसंवर्धन विषयक आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती व्हावी म्हणून पशुसंवर्धन विभागाचा स्टॉल उभारून शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या वैरणीच्या चारा पिकांची, योजनांची माहिती, गायी म्हैशी मध्ये कृत्रिम रेतन संदर्भात महत्व, दूध उत्पादन वाढी संदर्भात तसेच जनावरांना आवश्यक खाद्य, शेळी पालन, कुक्कुटपालन विषयक विस्तृत माहिती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना दिली.
यावेळी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.डी.ए.शिंपी, पशुधन विकास अधिकारी डॉ.तुषार वेर्लेकर, असरोंडी पशुधन पर्यवेक्षकमनीषा सावंत – जोगळे, मिताली कवटकर, वसंत सवादे, साक्षी सावंत, उमेश पेंडुरकर, परिचर दत्तगुरु गावकर, कृष्णा सावंत, महेश परुळेकर आदी उपस्थित होते.