*कोंकण Express*
*कसाल येथील रक्तदान शिबिरात 22 रक्तदात्यांचा सहभाग*
*कुडाळ : प्रतिनिधी*
सिंधुदुर्ग जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा असल्यामुळे मेडिकल रिस्पेझेंटीव्ही संघटना आणि रोटरी क्लब सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन डॉक्टर प्रशांत कोलते हॉस्पिटल कसाल येथे आयोजित करण्यात आले होते. त्या रक्तदान शिबिरात एकूण 22 रक्तदात्यांनी रक्तदान केले.
यावेळी डॉक्टर प्रशांत कोलते आणि सिंधू रक्त मित्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश तेंडुलकर सदस्य साई आंबेरकर तसेच रोटरी क्लब ऑफ सिंधुदुर्गचे अध्यक्ष व्हिक्टर फर्नांडिस डॉ वैभव आईर, प्रथमेश सावंत, मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ही संघटनेचे अध्यक्ष रुपेश रेवडेकर खजिनदार नितीन लिंगोजी आणि जॉईंट सिक्रेटरी दत्तप्रसाद गोवेकर उपस्थित होते. या शिबिरासाठी ब्लड बँक सावंतवाडीचे सातार्डेकर यांनी मोलाचे सहकार्य केले या रक्तदान कार्यात ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले त्यांचे मेडिकल रिप्रेझेंटेटीव्ही संघटनेकडून आभार व्यक्त करण्यात आले.