*कोंकण Express*
*वेंगुर्ले भाजप पदाधिकाऱ्यांनी घेतली दीपक केसरकर यांची भेट*
*वेंगुर्ले : प्रतिनिधी*
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात दीपक केसरकर यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवत आमदार म्हणून निवडून आले. त्याबद्दल त्यांचे वेंगुर्ले भाजपा पदाधिकारी यांनी मुंबई येथे भेट घेऊन अभिनंदन केले.
यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, भाजपा तालुका सरचिटणीस प्रशांत प्रभूखानोलकर, विल्सन डिसोजा आदी उपस्थित होते.