*कोंकण Express*
*भाजपा उपतालुकाध्यक्ष सोनू सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन*
*कणकवली : प्रतिनिधी*
कणकवली भाजपा उपतालुकाध्यक्ष राजेश उर्फ सोनू सावंत यांचा वाढदिवस विविध सेवाभावी उपक्रमांनी उद्या २८ नोव्हेंबर रोजी साजरा केला जाणार आहे. सोनू सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त प्राथमिक आरोग्य केंद्र वरवडे येथे उद्या सकाळी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रक्तदान शिबिराचे उदघाटन सकाळी ८ वाजता वरवडे पीएचसी येथे होणार आहे.
महिलांसाठी विशेष हळदीकुंकू समारंभाचेही आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत हळदीकुंकू समारंभ वरवडे प्राथमिक आरोग्य केंद्र येथे संपन्न होणार आहे. तसेच वरवडे गावातील तिन्ही जिल्हापरिषद शाळा आणि अंगणवाडी मधील सर्व विद्यार्थ्यांना मोफत स्कुल बॅग आणि खाऊ वाटप करण्यात येणार आहे. कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन सोनू सावंत मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.