*कोंकण Express*
*भाजपा जिल्हा प्रवक्ते अंकुश जाधव आणि कार्यकर्त्यांनी दिल्या आम.नितेश राणेंना शुभेच्छा*
*कणकवली : प्रतिनिधी*
नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीत भाजपा महायुतीने निर्विवाद यश प्राप्त केले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदारसंघात सावंतवाडीतून श्री दिपक केसरकर साहेब, कुडाळ – मालवण श्री निलेशजी राणे साहेब, आणि कणकवली, देवगड, वैभववाडी मतदार संघातून भाजपा महायुतीचे उमेदवार आमदार म्हणून श्री नितेशजी राणे विक्रमी मताने विजयी झाले. त्यांचे अभिनंदन आणि शुभेच्छा देण्यासाठी मुंबई येथे जुहू येथील निवासस्थानी त्यांची आज भेट घेतली आणि त्यांना शुभेच्छा दिल्या या वेळी.
माजी समजकल्यान सभापती तथा भाजपा जिल्हा प्रवक्ते श्री अंकुशजी जाधव, कणकवली शहराचे माजी नगरसेवक श्री गौतम खुडकर, ओरस मंडल अध्यक्ष श्री विनोद कदम, भाजपा सोशल मीडिया प्रमुख श्री किरण देवेंद्र जाधव उपस्थित होते.
यावेळी आमदार श्री नितेशजी राणे यांनी अनुसूचित जाती वस्त्यामधील विकास कामाबाबत सकारात्मक चर्चा केली.