शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचा आचरा येथे सन्मान

शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचा आचरा येथे सन्मान

*कोंकण Express*

*शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचा आचरा येथे सन्मान*

*मालवण : प्रतिनिधी*

कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघात गेली दहा वर्षे आमदार असणारे वैभव नाईक यांचा पराभव करून विजयी झालेल्या आमदार निलेश राणे यांच्या विजयात महत्वाची भूमिका बजावणारे शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचे मंगळवारी रात्री आचरा येथे जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी आचरा सरपंच जेरान फर्नांडिस यांच्या हस्ते त्यांचा शाल श्रीफळ देऊनसत्कार करण्यात आला. यावेळी त्यांच्या सोबत तालुकाध्यक्ष महेश राणे, निलिमा सावंत, आचरा उपसरपंच संतोष मिराशी, डॉक्टर प्रमोद कोळंबकर, जयप्रकाश परुळेकर, चावल मुजावर, सचिन हडकर, अवधूत हळदणकर, भाऊ हडकर, उदय घाडी, दत्ता वराडकर, रुपेश हडकर, महेंद्र घाडी, अभिजीत सावंत, चंदू कदम, श्रीपाद सावंत, सुनील आचरेकर, अजित घाडी, किशोर आचरेकर, अनिकेत घाडी, सारंग, ऋषी मेस्त्री, संदेश मेस्त्री, राणे, कांबळीयांसह बहुसंख्य ग्रामस्थ, शिवसैनिक आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!