*कोंकण Express*
*अल्पसंख्यांकांना विकासाची मोठी संधी ! – व्हिक्टर फर्नांडिस*
*सिंधुदुर्ग : प्रतिनिधी*
खासदार नारायण राणे यांनी जाती – पातीबाबत कधीच राजकारण केलेले नाही. ते नेहमी अल्पसंख्यांकाच्या पाठीशी राहिले म्हणूनच जिल्ह्यात सर्व अल्पसंख्याक महायुतीच्या तिन्ही उमेदवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. त्यांच्या विजयात अल्पसंख्याक लोकांचा मोठा वाटा असून पुढील काळात निश्चितपणे तिन्ही विजयी उमेदवार अल्पसंख्यांकांच्या विकासासाठी काम करतीत, असा विश्वास भाजप अल्पसंख्याक जिल्हा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष व्हिक्टर फर्नांडिस यांनी विधानसभा निवडणूक निकाल नंतर व्यक्त केला आहे.
जिल्ह्यात महायुतीकडून निवडून आलेल्या कणकवलीचे आमदार नितेश राणे, सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर, कुडाळचे विजयी उमेदवार निलेश राणे यांच्या विजयाबाबत खास अभिनंदन करत व्हिक्टर फर्नांडिस यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. नारायण राणे अनेक वर्षे राजकारणात आहेत. त्यांनी जाती-पातीबाबत कधीही दुजाभाव केला नाही. अल्पसंख्याकांच्या विकासाबाबत त्यांनी कायम प्रयत्न केला. हाच वारसा आमदार नितेश राणे पुढे चालवत आहेत. निलेश राणे व केसरकर यांनीही नितेश राणे पुढे चालवत आहेत. निलेश राणे व केसरकर यांनीही अल्पसंख्याक समाजाला पुढे आणण्यासाठी प्रयत्न केले. म्हणून अल्पसंख्याक मोर्चातर्फे जिल्ह्यात वाडी-वाडीमध्ये व गृहभेटी देऊन महायुतीचे उमेदवारांना निवडूण आणण्यासाठी प्रयत्न केले.
त्याप्रमाणे त्यांनी उमेदवारांच्या पाठीशी अल्पसंख्याक उभा राहिलेला आहे. त्यामुळे त्यांच्या विजयात महत्त्वाचा वाटा ठरलेला आहे. अल्पसंख्याकांसाठी विविध योजना आहेत या राबवण्याचे काम तिन्ही आमदार करतील अल्पसंख्यांक मोर्चा ही जिल्ह्यात विकासात्मक कामे करणार आमचे प्रश्न सोडवण्यासाठी निश्चितपणे या आमदारांच्या माध्यमातून विधानसभेत आवाज उठवला जाईल राज्यात स्थिर सरकार आल्याने अल्पसंख्यांकासह जिल्ह्यातील सर्व समाजाच्या विकासासाठी तिन्ही आमदार काम करतील असे सांगितले.

