कणकवलीत सकल मराठा समाजाच्यावतीने उद्या शिवजयंती

कणकवलीत सकल मराठा समाजाच्यावतीने उद्या शिवजयंती

*कोकण Express*

*कणकवलीत सकल मराठा समाजाच्यावतीने उद्या शिवजयंती…*

*कणकवली ः प्रतिनिधी*

सकल मराठा समाज , कणकवलीच्यावतीने शिवजयंती २०२१ शिवजयंती उत्सवाचे आयोजन केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे कणकवली शुक्रवार दिनांक फेब्रुवारी २०२१ साजरा होणार आहे .जिल्हास्तरीय गाथा महाराष्ट्राची वक्तृत्व स्पर्धा होणार आहे.तसेच माझी मायबोली,राधानगरी प्रस्तुत भव्य सांस्कृतिक कार्यक्रम सायंकाळी ८ वाजता होणार आहे.सकाळी ठिक ९ .०० वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे पुजन, सकाळी १० वाजता – जिल्हास्तरीय गाथा महाराष्ट्राची वक्तृत्व स्पर्धा, त्यानंतर १०.३० ते १२.०० वाजता – चित्रकला स्पर्धा, स्पर्धेचे ठिकाण – छत्रपती शिवाजी महाराज चौक पंचायत समिती जवळ , कणकवली साद मराठमोळ्या मनाला भुपाळी , ओव्या , दिंडी , भारुड , पोवाडा , शेतकरी नृत्ये , लावणी यांचा बहरदार नजराणा , पिंगळा , वासुदेव , गोंधळी , आदिवासी , कडकलक्ष्मी आदी लोककलाकारांसह बैलगाडी घेवून जाणारा शेतकरी व नयनरम्य नृत्याविष्कारासह ठसकेदार लावणी होणार आहे.प्रत्यक्ष रंगमंचावर छत्रपती शिवरायांच्या विरश्रीची मशाल हाती घेवुन स्वराज्याच्या मातीत पुन्हा एकदा संस्कृतिकचे वाण पेरण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न केला जाणार आहे.हे सर्व कार्यक्रम पंचायत समिती जवळ छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे होणार आहे.तरी शिवजयंती उत्सव कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित रहावे,असे आवाहन मराठा समाजाच्यावतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!