*कोंकण Express*
*नेमळेत महावितरणचा ट्रान्सफार्मर जळून खाक*
*गावातील विद्युत प्रवाह खंडित*
*सावंतवाडी : प्रतिनिधी*
नेमळे सातेरी मंदिरच्या बाजूला असलेला महावितरणचा विद्युत ट्रान्सफॉर्मर जळून खाक झाला. ही घटना बुधवारी पहाटे साडेतीन ते चार वाजण्याच्या सुमारास घडली. यामुळे या परिसरातील विद्युत पुरवठा खंडित झाला असून विद्युत पुरवठा त्वरित पूर्ववत करण्यात यावा असे मागणी स्थानिकांनी केली आहे.
निंबळे सातेरी मंदिर च्या बाजूला असलेल्या ट्रान्सफॉर्मरला बरीच वर्षे झाली होती. सदरचा ट्रांसफार्मर जीर्ण झाल्याने तो बदलण्यात यावा अशी मागणी स्थानिकांकडून वेळोवेळी करण्यात आली होती. मात्र महावितरण कडून त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. त्यानंतर बुधवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली.
मंगळवारी रात्री पर्यंत या ट्रान्सफॉर्मर मधून विद्युत प्रवाह सुरळीत होत होता. मात्र, पहाटे सुरु झालेल्या वादळी वाऱ्यामुळे विद्युत वाहिन्यांमध्ये स्पार्क होऊन ट्रान्सफॉर्मरचा अचानक स्फोट झाला व तो जळून खाक झाला. यामुळे नेमळे गावात पहाटे पासून विद्युत प्रवाह खंडित झाला आहे.
त्यामुळे नवीन ट्रांसफार्मर त्वरित बसवून विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात यावा अशी मागणी निंबळे ग्रामस्थांनी केली आहे. त्या पार्श्वभूमीवर लवकरच नवीन ट्रान्सफॉर्मर बसवून विद्युत प्रवाह सुरळीत केला जाईल, अशी माहिती नेमळे वायरमन विजय सोन्सूरकर यांनी दिली आहे.