*कोंकण Express*
*राज्यातील यशानंतर रविंद्र चव्हाण यांनी आंगणेवाडी येथे घेतले भराडी देवीचे दर्शन*
*मालवण : प्रतिनिधी*
लोकांच्या आशीर्वादामुळे राज्यात निर्विवाद महायुतीची सत्ता आली आहे. त्यामुळे आता येणाऱ्या काळात कोकणातील स्थलांतर रोखण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. प्रलंबित रस्ते व अन्य समस्या मार्गी लावण्यासाठी आमचे विशेष लक्ष असणार आहे, असे आश्वासन भाजप नेते तथा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी आज येथे व्यक्त केले. दरम्यान सर्वसामान्य जनतेला केंद्रबिंदू मानत महायुती सरकारने काम केले. त्यामुळे मताचा टक्का वाढला. त्याची परतफेड येणाऱ्या काळात जनतेसाठी करून देण्यात येणार आहे, असे ते म्हणाले.
राज्यात मिळालेल्या यशानंतर श्री. चव्हाण यांनी आज आंगणेवाडी येथे उपस्थित राहून भराडी मातेचे दर्शन घेतले. यावेळी माजी आमदार प्रमोद जठार, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा बँक संचालक बाबा परब, रणजित देसाई, अॅड. अजित गोगटे, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, भाजप महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर, संदीप मेस्त्री, भाजप शहराध्यक्ष बाबा मोंडकर, विजय केनवडेकर, गणेश कुषे, माजी उपसभापती राजू परुळेकर, दाजी सावजी, दादा साईल, सचिन आंबेरकर, महेश मांजरेकर, महेश बागवे, आबा हडकर, ललित चव्हाण, शिवसेनेचे जिल्हा संघटक महेश कांदळगावकर, प्रीतम गावडे, काका आंगणे, बाबू आंगणे, दिनेश आंगणे, विक्रांत नाईक यांच्यासह भाजपचे अन्य पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

