*कोंकण Express*
*हळबे महाविद्यालयात संविधान दिन साजरा*
*दोडामार्ग : प्रतिनिधी*
दोडामार्ग येथील लक्ष्मीबाई सिताराम हळबे कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि आजीवन विस्तार विभाग यांच्या वतीने संविधान दिवस साजरा करण्यात आला यावेळी संविधानाचे वाचन करून सर्वांना सरनाम्याची शपथ दिली.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून घटनेचे अभ्यासक व माजी शिक्षणाधिकारी गोवा श्री सुहास ठाकूर देसाई यांचे प्रमुख व्याख्यान आयोजित करण्यात आले होते जगातील क्लिष्ट व मोठी घटना म्हणून भारतीय संविधानाकडे बघितले जाते यामधील प्रत्येक वाक्य हे जपून वापरणे गरजेचे आहे अन्यथा त्याचा अनर्थ होईल एक जरी शब्द वगळला तर बाकीच्या शब्दांना कोणताही अर्थ राहणार नाही भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर घटना समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संपूर्ण जगातील विविध देशांच्या घटनांचा अभ्यास करून आम्हाला घटना दिली भारत मातेसाठी ही घटना अर्पित केली इथले नदी नाले, हवा पाणी, झाडे यांना त्याने भारतमाता असे संबोधले आहे त्यामुळे या भारत मातेचा संभाळ करणे अत्यंत महत्त्वाचे आहे आपल्या अधिकाराबरोबरच आपली कर्तव्य ही तेवढीच अत्यंत महत्त्वाची आहे जशी घटना वयाने मोठी होत जाईल तसं त्याचं आणखी महत्त्व वाढत जाईल
जगात आपल्याबरोबर स्वतंत्र झालेल्या देशांना अजूनही घटना नाही त्या ठिकाणी हुकूमशाही कार्यरत आहे या हुकूमशाही देशात सर्वसामान्य कोणतेही हक्क मिळत नाहीत परंतु हेच हक्क आपल्याला घटनेने बहाल केली आहे ज्याप्रमाणे मतदानाचा अधिकार भाषण स्वातंत्र्य असे अनेक भाग आपल्याला घटनेने दिले आहेत यावेळी त्यांनी फ्रेंच राज्यक्रांतीचे उदाहरण दिले आहे ही फ्रेंच राज्यक्रांती ही रक्तरंजित क्रांती होती लोकांना कोणतीही अधिकार नव्हतेच यालाच एक दिवस वाचा फोडत असताना रक्तरंजित क्रांतीतून लोकांनी स्वातंत्र्य मिळवले व राणीचे राज्य खालसा केले.
यावेळी अनेक उदाहरणे देऊन त्यांनी घटनेचे महत्त्व सांगितले आजच्या विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त वाचन करून घटनेचा अर्थ समजून घ्यावा मुलांनी व्यसंगी व्हावी तरच तुम्हाला घटनेचा अर्थ कळणार आहे तुमची अधिकार तुमची जबाबदारी यामुळेच तुम्ही देशाचे नाव उज्वल करणार आहात आणि जगात भारत नंबर वन असेल यावेळी त्यांनी घटनेचा अर्थ लावणे या प्रक्रियेवर सुद्धा भाष्य केले महाविद्यालयाचे प्राचार्य आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर सुभाष सावंत यांनी मतदानाचा अधिकार किती महत्त्वाचा आहे आपले भविष्य आपल्या हाती आहे तुम्ही निवडून दिलेला लोकप्रतिनिधी हा निष्कलंक निवडणे हे तुमच्या हातात आहे यावेळी व्यासपीठावर घटनेचे गाढे अभ्यासक तथा गोवा येथील माजी शिक्षणाधिकारी श्री सुहास ठाकूर देसाई, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सुभाष सावंत, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी डॉक्टर संजय खडपकर, आजीवन विस्तार विभागाचे समन्वयक डॉक्टर सोपान जाधव, प्राध्यापक, प्राध्यापिकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर संजय खडपकर यांनी, सूत्रसंचालन कुमारी सानिया गवंडळकर तर आभार निकिता नाईक हिने केले.