*कोंकण Express*
*ग्रंथालय हेच खरे ज्ञानाचे भांडार – डॉ. सतीश कामत*
*फोंडाघाट : प्रतिनिधी*
येथील कला आणि वाणिज्य महाविद्यालय फोंडाघाटच्या मराठी विभागाच्या विद्यार्थ्यांनी मधु दंडवते वाचनालयाला भेट दिली. विद्यार्थी पुस्तकांपर्यंत पोहोचले पाहिजेत,ती चाळली पाहिजेत, त्यातून ज्ञानग्रहण केले पाहिजे या उद्देशाने विभाग प्रमुख डॉ. सतीश कामत व प्रा.जगदीश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला. त्याप्रसंगी बोलताना प्रा. जगदीश राणे म्हणाले की विद्यार्थी ग्रंथालयापर्यंत पोहोचले पाहिजेत,त्यांनी पुस्तके वाचले पाहिजेत. मधु दंडवते ग्रंथालय ही किती टापटीप आहे. ग्रंथालयात आल्याबरोबर प्रसन्न वाटते. पुस्तकाकडे जावेसे वाटते अशा ग्रंथालयात आपण गेले पाहिजे. असे आवाहन त्यांनी केले
डॉ. सतीश कामत म्हणाले की मोबाईलच्या जगात हरवू नका. पुस्तक तुमची वाट पाहत आहेत. ती गुदमरली तर आपणही गुदमरून जाऊ. आपले ज्ञान नक्कीच कोंडले जाईल. ग्रंथालय हेच खरे ज्ञानाचे भांडार आहे. पुस्तकावरची धूळ वाचक झाडतो आणि वाचकाच्या मेंदूवरची धूळ पुस्तके झाडतात. त्यामुळे ग्रंथालयाचा जास्तीत जास्त उपयोग आपण केला पाहिजे. असे प्रतिपादन केले.
ग्रंथपाल सौ.नेरूरकर यांनी मुलांना ग्रंथालयात आणले म्हणून शिक्षकांचे आभार मानले. नजरेसमोर ग्रंथालय असून आपण त्याकडे पाहत नाही. त्या निमित्ताने मुल ग्रंथालयापर्यंत येतील असा त्यानी आशावाद व्यक्त केला आणि सर्वांचे आभार मानले.