*कोंकण Express*
*कोल्हापूर विभागीय कराटे स्पर्धेत कणकवली विद्यामंदिरची भक्ती कांदळकर ब्राँझ मेडलची मानकरी*
*कणकवली : प्रतिनिधी*
विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेची विद्यार्थीनी कुमारी भक्ती कांदळकर ही विभागीय क्रीडा स्पर्धेत कराटे या खेळ प्रकारात १४ वर्षाखालील मुलींच्या गटात ३८ kg – ४२ kg या गरात क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे व जिल्हा क्रीडा कार्यालय कोल्हापूर आयोजित कोल्हापूर विभागीय कराटे स्पर्धेत ब्राँझ मेडल प्राप्त करून यशाची भरारी मारली.
प्रशालेचे क्रीडा शिक्षक अच्युतराव वणवे सर व सुदिन पेडणेकर सर यांनी मार्गदर्शन केले.कुभक्ती कांदळकर हिचे अभिनंदन प्रशालेचे मुख्याध्यापक पी.जे कांबळे सरांनी केले तसेच पर्यवेक्षिका वृषाली जाधव मॅडम यांनीही अभिनंदन केले. कु.भक्ती कांदळकर हिचे शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा तवटे साहेब चेअरमन डॉ साळुंखे मॅडम सचिव मा वळजूं साहेब व सर्व संख्या पदाधिकारी यांनी कौतुक केले .