प्रात्यक्षिक ज्ञानाचा अचूक खजिना म्हणजे भौगोलिक हवामान विषयक उपकरणे – प्रा.डॉ.राजाराम पाटील

प्रात्यक्षिक ज्ञानाचा अचूक खजिना म्हणजे भौगोलिक हवामान विषयक उपकरणे – प्रा.डॉ.राजाराम पाटील

*कोंकण Express*

*प्रात्यक्षिक ज्ञानाचा अचूक खजिना म्हणजे भौगोलिक हवामान विषयक उपकरणे – प्रा.डॉ.राजाराम पाटील*

*फोंडाघाट महाविद्यालयातील भूगोल विषयाच्या विद्यार्थ्यांची लोरे हवामान केंद्रामध्ये भेट*

*कणकवली : प्रतिनिधी*

भूगोल हा विषय विश्व व्यापक असून वर्गात वर्गातील अध्ययनाबरोबर, प्रत्यक्ष भूमीवरील उठाव, खडक, वनस्पती आणि पाणी यांचा अभ्यास महत्वाचा असतो.विद्यार्थ्यांना वर्गातील ज्ञानाबरोबरच प्रात्यक्षिक ज्ञान व्हावे, यासाठी क्षेत्र पाहणी भेटीचे आयोजन नुकतेच फोंडाघाट महाविद्यालयातील भूगोल विभाग प्रमुख डॉ. राजाराम पाटील यांनी लोरे येथे असणाऱ्या हवामान केंद्रामध्ये केले होते.

हवामान विषयक उपकरणे ही दैनंदिन जीवनाचे सोबती असतात असे प्रा. डॉ. राजाराम पाटील म्हणाले. प्रॅक्टिकल व अनुभव यासाठी फील्डवर जाऊन प्रत्यक्ष पाहणी करावी लागते. तसेच भूगोल हा विषय भौगोलिक विविधता जपणारा व माहिती देणारा आहे. हवामान प्रत्येक विभागानुसार तसेच प्रदेशानुसार बदलत असते. हवामानाच्या कार्याची नोंद विविध प्रकारच्या उपकरणांच्या साह्याने केली जाते. 24 तास, हवामान विषयक बदलांची नोंद करणारी स्वयंचलित उपकरणे लोरे नंबर 1 हवामान केंद्रामध्ये आहेत.

पर्जन्य किती झाले, बाष्पीभवन किती होते, याची दररोज नोंद करावी लागते. त्याचबरोबर कमाल व किमान तपमानाची नोंद, हवेचा वायुभार, आद्रता, वाऱ्याचा वेग आणि वाऱ्याची दिशा दाखवणारा वायू दिशादर्शक यांचे कार्य, अशा हवेच्या विविध घटकांचा अभ्यास करण्यासाठी, त्याचबरोबर उपकरणांच्या कार्याची नोंद कशी ठेवली जाते याचे निरीक्षण विद्यार्थ्यांनी केले. या भेटीसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पुरंधर नारे सर यांनी परवानगी दिली, त्याबद्दल कुमारी साक्षी परब हिने सर्वांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!