वैभववाडी येथे दंगा काबू पथकाची रंगीत तालीम

वैभववाडी येथे दंगा काबू पथकाची रंगीत तालीम

*कोकण Express*

*वैभववाडी येथे दंगा काबू पथकाची रंगीत तालीम*

*वैभववाडी येथे दंगा काबू पथकाची रंगीत तालीम*

*वैभववाडी ः प्रतिनिधी*

शिवजयंती उत्सव व कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावमुळे केंद्र व राज्य सरकारने दिलेल्या निर्देशानुसार कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी वैभववाडी पोलीस विभाग सज्ज झाला आहे.बुधवारी 17 फेब्रुवारी रोजी वैभववाडी शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी शिवजयंती उत्सव सुरळीत पार पाडण्यासाठी व कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी वैभववाडी पोलिसांनी दंगा काबू पथकाने संभाजी चौक येथे रंगीत तालीम केली.
शिवजयंती उत्सव 19 फेब्रुवारी रोजी होणार आहे.तालुक्यातील गावागावांमध्ये हा उत्सव साजरा केला जाणार आहे.जनतेने आपले आरोग्य निरोगी राहण्यासाठी काळजी घ्यावी.या शिवजयंती उत्सवाच्या निमित्ताने व कोरोना संसाराच्या पार्श्वभूमीवर वैभववाडी शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी वैभववाडी पोलिसांनी दंगा काबू पथकाची रंगीत तालीम वैभववाडी शहरात केली.या तालमीत वैभववाडी पोलीस निरीक्षक अतुल जाधव, पोलीस उपनिरीक्षक प्रविण देसाई,पोलिस सहाय्यक अधिकारी रविकांत अडुळकर,पोलीस गणेश भोवड व अन्य पोलीस कर्मचारी यावेळी सहभागी झाले होते.यावेळी पोलिस निरीक्षक अतुल जाधव म्हणाले, शिवजयंती उत्सव व कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील जनतेने शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे,मास्क व सॅनिटायझर यांचा वापर करावा,गर्दी करू नये,सोशल डिस्टन्ससिंगचे पालन करावे असे आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!