भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी महाविकासआघाडीवर आज चौफेर टीका केली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देखील विविध मुद्द्यावर चंद्रकांत पाटील यांनी टोला लगावला आहे. शिवसैनिकांकडून माजी नौदल अधिकाऱ्याला झालेल्या मारहाण प्रकरणावर भाष्यं करताना, शिवसेना दादागिरी करत असल्याचं ते म्हणाले. तसेच, मराठा आरक्षणाबाबत महाविकासआघाडीने मराठा समाजाच्या पाठीत खंजीर खुपसला असल्याची बोचरी टीकाही चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केली.
पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपाकडून दिव्यांग व्यक्तींना साहित्य वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमानंतर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील माध्यमांशी बोलत होते.