*कोकण Express*
*सावंतवाडी नगरपालिका प्रशासनाची भाजी विकेत्यांवर पुन्हा कारवाई*
*भाजी विक्रेते आक्रमक, मुख्याधिकाऱ्यांची विक्रेत्यांशी गुप्त चर्चा*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
सावंतवाडीतील बाजारपेठेच्या बाहेर बसणाऱ्या भाजी विक्रेत्यांवर आज पुन्हा एकदा नगरपालिका प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली.
यावेळी भाजी विक्रेत्यांचे सामान जप्त करण्यात आले. त्यामुळे भाजी विक्रेते आक्रमक झाले आहेत. त्या विक्रेत्यांनी पालिका कार्यालयात धाव घेऊन मुख्याधिकाऱ्यांना याबाबत जाब विचारला. आमच्यावर अन्याय होत आहे, आम्ही नेमके कुठे बसायचे, असा सवाल त्यांनी केला असून पालिका प्रशासनाकडून झालेली कारवाई चुकीची असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.