वेंगुर्ला तालुका मनसेची सार्वजनिक बांधकाम कार्यालयाला धडक

वेंगुर्ला तालुका मनसेची सार्वजनिक बांधकाम कार्यालयाला धडक

 

*कोंकण Express*

*वेंगुर्ला तालुका मनसेची सार्वजनिक बांधकाम कार्यालयाला धडक*

*खराब रस्त्यांचा विचारला जाब*

*वेंगुर्ला : प्रतिनिधी*

सार्वजनिक बांधकाम विभाग मार्फत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यात बोर्डी ठाणे न्हावाशेवा रेवस विजयदुर्ग मालवण वेंगुर्ला शिरोडा सातार्ड रस्ता सुधारणा व डांबरीकरण करणे कामाचा कार्यारंभ आदेश झाला होता. त्यानंतर गेल्या जून महिन्याच्या प्रारंभी ठेकेदाराने सदर रस्त्याचे डांबरीकरणाचे काम पूर्ण केले होते. सदर रस्त्याचे काम पूर्ण होऊन सात महिन्यातच रस्त्याचे डांबरीकरण पूर्णपणे उखडून गेले आहे व रस्ता पूर्णपणे खराब झालेला आहे.

तब्बल 24 महिन्याचा जोखीम कालावधी असताना केवळ ७ महिन्यातच सदर रस्त्याचे काम खराब होणे म्हणजे सा. बांधकाम विभागाचा निष्काळजीपणा आहे. सदर रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदाराने डांबरीकरण कामाच्या गुणवत्तेबाबत तडजोड केल्याचे दिसून येत आहे.

वरील बाबी लक्षात घेता तसेच आत्तापर्यंतच्या रस्ता सुधारणा कामाचे कार्यपद्धती व इतिहास पाहता सदोष कार्यपद्धतीमुळे रस्ता वर्षाच्या आतच खराब होण्याचे प्रमाण फार वाढले आहे. आणि म्हणूनच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमार्फत तूर्तास निवेदन देऊन विनंती करण्यात आली की सदर वेंगुर्ला शिरोडा रस्त्याचे निकृष्ट झालेले काम ठेकेदारामार्फत आपण सक्तीने पुन्हा करून घ्यावे. आणि याबाबत आम्हास आपल्या विभागामार्फत केलेल्या कार्यवाहीचे येत्या आठ दिवसांत लेखी पत्राद्वारे कळवावे. अन्यथा कोणत्याही पूर्वसूचने शिवाय महाराष्ट्र नवनिर्माण सेना संबंधित कार्यालयात जोपर्यंत ठोस लेखी उत्तर मिळत नाही तोपर्यंत ठिय्या आंदोलन करेल असा इशारा मनसे तालुका अध्यक्ष श्री सनी बागकर ह्यांनी दिला.

निवेदन सादर करते वेळी तालुका अध्यक्ष सनी बागकर ह्यांच्या सोबत महादेव तांडेल व विनायक फटनाईक उपतालुका अध्यक्ष, सुरज मालवणकर शहर अध्यक्ष, पवन बागायतकर विभाग अध्यक्ष आणि प्रथमेश नाईक शहर उपाध्यक्ष व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!