*कोंकण Express*
*कुडाळात २८ नोव्हेंबरला पाठांतर- भक्तिगीत गायन स्पर्धेचे आयोजन*
*कुडाळ : प्रतिनिधी*
रा. ब. अनंत शिवाजी देसाई वाचनालया (जिल्हा ग्रंथालय) च्यावतीने संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पुण्यतिथीनिमित २८ नोव्हेंबर रोजी येथील वाचनालयाच्या सभागृहात वामनराव नाडकर्णी स्मृती पाठांतर व भक्तिगीत गायन स्पर्धा आयोजित केली आहे. गट क्र. १ पहिली ते चौथी : विषय- समर्थ रामदास स्वामींचे १ ते ३० मनाचे श्लोक व सोबत पुढीलपैकी एक प्रार्थना १. खरा तो एकची धर्म- साने गुरुजी, २. या भारतात बंधुभाव नित्य वसू दे-संत तुकडोजी महाराज, गट क्र. २ पाचवी ते सातवी विषय-श्री संत ज्ञानेश्वर महाराज हरिपाठातील पहिले वीस श्लोक. दोन्ही गटांमध्ये प्रथम क्रमांक ५०१ रु., द्वितीय ३०१ रु., तृतीय २०१ रु. रोख व प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहे. द्वितीय सत्रात भक्तिगीत गायन स्पर्धा दुपारी ३ ते सायंकाळी ६ या वेळेत होणार आहे.
ही स्पर्धा बाल व खुला अशा दोन गटांत होणार आहे. गट क्र. १-बालगट (वय वर्षे पंधराच्या आतील मुलांसाठी, तालुकास्तर) पारितोषिके गट क्र. १-प्रथम क्रमांक५०१ रु., द्वितीय ३०१ रु., तृतीय २०१ रु. रोख व प्रशस्तीपत्र, गट क्र. २ खुला गट (वय वर्षे पंधराच्या पुढील व्यक्तींसाठी, जिल्हास्तरीय) पारितोषिके : प्रथम क्रमांक ६०१ रु. रोख व प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहे. संपर्क ग्रंथपाल मोबा- ९४०३५६१५४९