*कोकण Express*
*आंजिवडे घाटासाठी केंद्रीय भुपृष्ठमंत्री नितीनजी गडकरी यांचे लक्ष वेधणार–अतुल काळसेकर*
*27 फेब्रुवारी रोजी गडकरी सिंधुदुर्ग कुडाळ दौऱ्यावर*
*सिंधुदुर्ग*
माणगाव खोरातील कोल्हापूरला जोडणा-या, अतिशय कमी वेळेत ,कमी खर्चात,धोकादायक वळणे नसलेल्या व जलद गतीने कोल्हापूर ला पोहचता येणा-या वेंगुर्ले- माणगाव-आंजिवडे घाटासाठी केंद्रीय भुपृष्ठमंत्री नितीनजी गडकरी यांचे लक्ष वेधून हा घाट होण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचे भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य अतुल काळसेकर यांनी सांगितले. केंद्र सरकार कडे पाठ पुरावा करून लवकरच या घाटासाठी आवश्यक असलेल्या परवानग्या मीळवणार .27 फेब्रुवारी रोजी शिष्टमंडळ गडकरी यांना भेटून निवेदन देत त्यांचे लक्ष वेधणार.