*कोंकण Express*
*कोकणातील ७ आमदारांची मंत्रिपदासाठी नावे चर्चेत*
*मुंबई*
विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात नवीन सरकार स्थापन होईल व नवीन मंत्रिमंडळाचा शपथविधी होईल. या नवीन मंत्रिमंडळात कोकणातील खालील मंत्र्यांचा समावेश असेल अशी चर्चा मुंबईतील राजकीय वर्तुळात सुरु आहे. १) श्री. उदय सामंत, रत्नागिरी २) श्री. दीपक केसरकर, सावंतवाडी ३) श्री. नितेश राणे, देवगड ४) श्री. भरत गोगावले, महाड ५) श्री. रविंद्र चव्हाण (मूळचे मालवण) ६) श्री. प्रवीण दरेकर (मूळचे पोलादपूर) ७) कु. आदिती तटकरे, श्रीवर्धन कोकणातील अशा नेत्यांचा नवीन मंत्रिमंडळात समावेश होईल अशी चर्चा आज मुंबईतील राजकीय वर्तुळात सुरु होती. मात्र याबाबत अधिकृत कोणताही निर्णय जाहीर झालेला नाही.