*कोकण Express*
*युवानेते अभय शिरसाट यांची सेनेला सोडचिट्ठी*
*कुडाळ ः प्रतिनिधी*
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत कुडाळमधील युवानेते अभय शिरसाट यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, जिल्हाध्यक्ष बाळा गावडे, मंदार शिरसाट आदी उपस्थित होते. अभय शिरसाट यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश झाल्याने काँग्रेसच्या गोटात आनंद व्यक्त होतोय. अभय शिरसाट हे सिंधुदुर्गातील शिवसेनेचे सक्रिय कार्यकर्ते आणि आमदार वैभव नाईक यांच्या अधिक जवळचे होते. अभय शिरसाट आणि आमदार वैभव नाईक हे दोघेही काही वर्षांपूर्वी काँग्रेसमध्ये एकत्र होते. अभय यांची शिवसेनेला सोडचिट्ठी दिली आहे . हा आमदार वैभव नाईक यांना मोठा धक्का मानला जातोय. मुख्य म्हणजे शिरसाट यांच्या काँग्रेस प्रवेशाने सिंधुदुर्गातील आणि विशेष करून कुडाळ तालुक्यातील पक्षाच्या वाढीस हातभार लागेल.