*कोंकण Express*
*राजापूरात किरण सामंत यांचा विजयी जल्लोष*
*राजापूर : प्रतिनिधी*
राजापूर विधानसभा मतदारसंघातून शिवसेना पक्ष व महायुतीचे अधिकृत उमेदवार किरण रविंद्र सामंत यांना निवडणुक निर्णय अधिकारी राजापूर यांनी विजयी घोषित केल्यानंतर राजापूरात ऐतिहासिक विजयाचा जल्लोष करण्यात आला.
राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा निवडणुकीत महायुतीचे किरण (भैय्या) सामंत यांनी महाविकास आघाडीच्या राजन साळवी यांचा १९९७४ मतांनी पराभव केला. राजन साळवी यांना पराभूत करून किरण सामंत यांनी कोकणात उबाठाप्रमुख उध्दव ठाकरे यांना हा मोठा धक्का दिला असल्याचे म्हटले जात आहे.