*कोंकण Express*
*नितेश राणेंच्या विजयाचा वैभववाडीत कार्यकर्त्यांनी केला जल्लोष*
*वैभववाडी : प्रतिनिधी*
आमदार नितेश राणे यांच्या विजयाची हॅट्ट्रिक झाल्याचं समजताच वैभववाडी तालुका भाजपच्यावतीने फटाक्यांची आतिषबाजी करीत जोरदार जल्लोष करण्यात आला तसेच राज्यात महायुतीला मिळालेले घवघवीत यशामुळे कार्यकर्ते आनंदीत झाले होते.
वैभववाडी येथील भाजप कार्यालयात शनिवारी सकाळपासूनच तालुक्यातील गावागावातून भाजपचे कार्यकर्ते दाखल झाले होते. मतदान मोजणी सुरू झाल्यानंतर जसजसे मतमोजणीच्या फेऱ्यांचे निकाल घोषित होऊ लागले तस तसा कार्यकर्त्यांचा उत्साह, जल्लोष फेरी गणित वाढत चालला होता. जोरदार घोषणाबाजी करीत एकमेकाला आलिंगन देत कार्यकर्ते आनंद व्यक्त करत होते. दुपारी अधिकृतपणे आमदार नितेश राणे यांच्या विजयाची घोषणा झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. त्यांनी भाजप कार्यालय ते दत्त मंदिर दरम्यान विजयी रॅली काढली. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
या रॅलीमध्ये भाजपा उपाध्यक्ष प्रमोद रावराणे तालुका मंडळ अधिकारी सुधीर नकाशे, माजी समाज कल्याण सभापती शारदा कांबळे, सीमा नानवडेकर, राजेंद्र राणे, देवानंद पालांडे, स्वप्नील खानविलकर, उत्तम सुतार, सुहास सावंत, दीपक माईणकर, बाबा कोकाटे, यांच्यासह मोठ्या संख्येने भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.