विजयाच्या चौकारासाठी हातभार लागलेल्या सर्वांचाच मी सदैव ऋणी

विजयाच्या चौकारासाठी हातभार लागलेल्या सर्वांचाच मी सदैव ऋणी

*कोंकण Express*

*विजयाच्या चौकारासाठी हातभार लागलेल्या सर्वांचाच मी सदैव ऋणी*

*मंत्री दीपक केसरकर यांनी सर्वांचे मानले आभार*

*सावंतवाडी ः प्रतिनिधी*

माझ्या विजयाच्या चौकारासाठी हातभार लागलेल्या सर्वांचाच मी सदैव आभारी- आम. दीपक केसरकर विधानसभा निवडणुकीसाठी मी सावंतवाडी मतदार संघातून उभा होतो. या निवडणुकीसाठी माझ्या पक्षातील सर्व पदाधिकारी, कार्यकत्यसिर, ऑफिस कर्मचारी, मित्रपक्षातील पदाधिकाऱ्यांनीही मला मी निवडून येणार असल्याचा ठाम विश्वास दिला. तसेच येथील जनतेनेही मला उत्स्फुर्तपणे सहकार्य केलं. त्याप्रमाणे माझा विजय निश्चित आहे. म्हणूनच माझ्या विजयाच्या चौकारासाठी हातभार लागलेल्या सर्वांचाच मी सदैव ऋणी राहिन आणि सर्वांचीच जाणीव सदैव ठेवीन असं आमदार दिपक केसरकर यांनी सांगितलं.

राज्यात स्वबळावर महायुतीचं सत्तेत येणार तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिन्ही जागांवरही महायुतीचा विजय निश्चित आहे असा ठाम विश्वास केसरकर यांनी यावेळी व्यक्त केला. मतदार संघातील आरोग्य आणि रोजगाराच्या प्रश्नाला प्राधान्य देणार असल्याचही ते यविळी म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!