*कोंकण Express*
*महाराष्ट्र राज्य वीज ग्राहक संघटना अध्यक्ष कै. प्रताप होगाडे यांना वीज ग्राहक संघटना सावंतवाडीच्या वतीने श्रद्धांजली*
*सावंतवाडी : प्रतिनिधी*
महाराष्ट्र राज्य वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष, थोर विचारवंत, अभ्यासू वीज तज्ज्ञ तथा माजी आमदार कै. प्रताप होगाडे यांचे सोमवार दिनांक १८ नोव्हे, रोजी सकाळी ८.०० वा. इचलकरंजी येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. राज्यातील वीज ग्राहकांच्या प्रश्नांसाठी आयुष्यभर झटलेले, महाराष्ट्रातील वीज निर्मिती आणि वीज पुरवठा मंडळावर वचक असणारे, अभ्यासू वीज तज म्हणून त्यांची ओळख होती. राज्यातील वीज ग्राहकाना मार्गदर्शन तसेच न्याय मिळवून देण्यासाठी कायम प्रयत्नशील असणारे, माजी आमदार असूनही सर्वांशी सलोख्याने वागणारे गितभाषी के. प्रताप होगाडे यांना वीज ग्राहक संघटना, सावंतवाडीच्या वतीने आज शुक्रवार दिनांक २२ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ११.३० वाजता शोकसभा घेऊन श्रद्धांजली वाहण्यात आली.
सहवेदना महाराष्ट्रातील प्रख्यात वीज तज्ञ प्रताप होगाडे यांचे निधन झाले. त्यांच्या स्मृती आणि कृतींना विनम्र अभिवादन !
घावेळी वीज ग्राहक संघटना सावंतवाडी तालुकाध्यक्ष संजय लाड, जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब बोर्डकर यांनी प्रताप होगाडे यांच्या बद्दलच्या आठवणी विषद केल्या. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दोन मिनिटे शांतता पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी जिल्हा सचिव दीपक पटेकर, तालुका उपाध्यक्ष आनंद नेवनी, तालुका सहसचिव समीर शिंदे, हरिश्चंद्र मांजरेकर, वेर्ले येथील सुरेश विष्णू राऊळ, भास्कर जडये सांगेली, मनोज घाटकर, संतोष तावडे आदी पदाधिकारी, वीज ग्राहक उपस्थित होते.
श्री प्रताप होगाडे यांच्या आकस्मिक निधनाने वीज ग्राहकांची हानी झाली आहे. वीज क्षेत्रात ग्राहक हितासाठी काम करणारे नेतृत्व आज काळाच्या पडद्याआड गेले आहे. प्रतापराव अत्यंत मृदुभाषिक होते, पण तितक्याच ठामपणे त्यांनी ग्राहक हितासाठी शासन दरबारी आवाज उठविला होता. वीज व्यवस्थेतील सुधारणा बाबत कायम जे अयोग्य ते दुरुस्त करणे साठी तेवढेच आग्रही होते.
विजेची निर्मिती असेल किंवा वितरणातील गळती असेल किंवा खोट्या गळती द्वारे लादली गेलेली दरवाढ, विविध राज्यांगध्ये असलेल्या वीज दराचा तुलनात्मक आढावा असेल, वीज नियामक आयोगाच्या विविध निकालांचे, विविध कोर्ट केसेसचे नंबर असतील अशी विविध आकडेवारी त्यांना तोंडपाठ होती. कोणत्याही परिणामांची तमा न बाळगता ते सातत्याने वीज मंडळांमध्ये बोकाळलेल्या व्यवस्था सामान्य जनतेच्या समोर आणणे व त्यात योग्य तो बदल होणेसाठी अखेर पर्यंत प्रयत्नशील होते.
संघटनेची ताकद ओळखून त्यांनी राज्यस्तरीय औद्योगीक वीज ग्राहक संघटनेची स्थापना केली व राज्यभर पायाला भिंगरी लावून फिरून संघटना मोठी केली. शासन दरबारी पण याची दखल वेळोवेळी घेतली गेली. त्यामुळे राज्य वीज नियामक आयोगाला बऱ्याचदा ग्राहक हिताचे निर्णय घेणे साठी योग्य तो दबाव निर्माण केला. माजी आमदार असून पण सर्वांशी अत्यंत साधेपणाने वागणे हा एक दुर्मिळ गुण त्यांचे अगी होता. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्राहकाचा जनता दरबार घेण्याचे ठरविले असताना आपली इतर कामे बाजूला सारून तात्काळ ते जिल्ह्यात दाखल झाले होते. त्यामुळे वीज क्षेत्रात राज्यभर प्रताप होगाडे यांचे नाव आदराने घेतले जाते.