*कोंकण Express*
*मनीष दळवींचा सिंधुदुर्ग पारंपरिक दशावतारी नाट्य मंडळाच्या मालकांतर्फे सत्कार*
*वेगुर्ले : प्रतिनिधी*
हकार कोकणरत्न पुरस्कार प्राप्त सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मूळ नऊ पारंपरिक दशावतारी नाट्य मंडळाच्या मालकांच्यावतीने शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. सहकाराच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला महाराष्ट्र राज्यात मानाचे स्थान निर्माण करून देणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांना कोकण विकास संस्थेचा यावर्षीचा “सहकार कोकण रत्न” हा पुरस्कार जाहीर करण्यात आल्यामुळे हा सत्कार करण्यात आला.
यावेळी सुधाकर दळवी, तुषार नाईक, नाथा नालंग, सौरभ पाटकर, बाबा मेस्त्री आदी उपस्थित होते.