गोपुरी आश्रम येथे २४ नोव्हेंबरला सुंदर हस्ताक्षर कार्यशाळा

गोपुरी आश्रम येथे २४ नोव्हेंबरला सुंदर हस्ताक्षर कार्यशाळा

*कोंकण Express*

*गोपुरी आश्रम येथे २४ नोव्हेंबरला सुंदर हस्ताक्षर कार्यशाळा*

*कणकवली : प्रतिनिधी*

कणकवली येथील गोपुरी आश्रम येथे जीवन शिक्षण शाळा गोपुरी आयोजित सुंदर हस्ताक्षर कार्यशाळा २४ नोव्हेंबर रोजी सकाळी ८.३० ते १२ वाजेपर्यंत होणार आहे. मुलांच्या अक्षराला वळण देण्यासाठी आयोजित या कार्यशाळेत तज्ज्ञ प्रशिक्षक मार्गदर्शन करणार आहेत. तसेच इंग्रजी व मराठी हस्ताक्षर सुधारण्यासाठी शांत व आल्हाददायक निसर्गाच्या सान्निध्यात ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.

या कार्यशाळेत प्रशिक्षक म्हणून अश्विनी जगदीश तावडे हे काम पाहणार आहेत. या कार्यशाळेत पहिली ते नववीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

गोपुरी येथील कार्यशाळेत येताना रायटिंग पॅड, सिंगल लाईन वही, पेन, पेन्सिल, पट्टी, खोडरबर, पाणी बॉटल हे घेऊन यायचे आहे. अधिक माहितीसाठी गोपुरी आश्रम वागदे यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!