मालवणात २७ रोजी तालुकास्तरीय खुली वाचक स्पर्धा

मालवणात २७ रोजी तालुकास्तरीय खुली वाचक स्पर्धा

*कोंकण Express*

*मालवणात २७ रोजी तालुकास्तरीय खुली वाचक स्पर्धा*

*मालवण : प्रतिनिधी*

सुप्रसिध्द साहित्यिक कोकणपुत्र जयवंत दळवी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त नगर वाचन मंदिर, मालवण तर्फे बुधवार दि. २७ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता मालवण तालुकास्तरीय खुली वाचक स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. जयवंत दळवी यांची कोणतीही साहित्यकृती’ हा या स्पर्धेचा विषय आहे.

ही स्पर्धा वय वर्षे १६ व त्यावरील स्पर्धकांसाठी खुली आहे. स्पर्धेतील प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांना रोख रक्कमेची पारितोषिके आणि प्रशस्तीपत्रके देण्यात येतील. स्पर्धेतील प्रथम तीन विजेत्यांना जिल्हा ग्रंथालय, कुडाळ येथे दि. १ डिसेंबर रोजी होणाऱ्या जिल्हास्तरीय वाचक स्पर्धेत थेट सहभाग मिळेल. इच्छुक स्पर्धकांची नावे दि. २२ नोव्हेंबर २०२४ पर्यंत संजय शिंदे, ग्रंथपाल, नगर वाचन मंदिर, मालवण याठिकाणी पाठवावी. अधिक माहितीसाठी ८३९०६९४२३१ व ९४२२२३४९५० या क्रमांकावर संपर्क साधावा, जास्तीत जास्त स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन संस्थेचे उपाध्यक्ष उदयराव मोरे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!